मुख्य बातम्या

सुनील शेळकेंचा झंझावात सुरूच, भाजपला दिला जबर दणका !

0

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन मंत्री बाळा भेगडे यांचा दारुण पराभव करणाऱ्या आमदार सुनील शेळके यांचा झंझावात सुरूच आहे. जवळपास 1 लाखांच्या मताधिक्याने मंत्री महोदयांवर जोरदार विजय मिळवल्यानंतर सुनील शेळकेंनी आपला मोर्चा आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वळवला आहे…

वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापतीच्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आल्याने गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सर्व सहा विषय समित्यांच्या सभापतिपदी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. भाजपला एकही सभापतिपद न मिळाल्याने धक्का बसला. गतवेळेस भाजपकडे तीन विषय समित्यांचे सभापतिपद होते.

Loading...

नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी गुरुवारी नगरपंचायतीत विशेष सभेचे आयोजन केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत सहापैकी चार विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध व दोन विषय समितीच्या निवडणुकीसाठी मतदान झाले.

Loading...

अखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव !

Previous article

आम्ही छाती फोडली तरी शरद पवारचं दिसतील, राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार परतले !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.