Royal Entertainmentमुख्य बातम्या

सावळेपणा कायमचा घालवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय…!

0

पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपण सुंदर दिसावे. परंतु जन्माला आलेला प्रत्येक जण हा सुंदर नसतोच. काहींचा रंग हा काळा, सावळा असतो अनेक जणांना असे वाटत असते की आपणही इतरांप्रमाणे गोरे दिसावे. म्हणजे आपणही सुंदर दिसू यासाठी बरेच जण अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतात.

तर बरेच जण हे महागड्या क्रिम द्वारे गोरे बनण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु हवा तसा रिझल्ट त्यामुळे मिळू शकत नाही. उलट केमिकलयुक्त क्रीम वापरल्यामुळे त्वचेवर खाज येणे, त्वचेची आग होणे, त्वचा आणखी काळपट पडणे किंवा त्वचेवर डाग उमटणे यांसारख्या बऱ्याचशा समस्या उद्भवत असतात. यासाठी काही घरगुती उपाय केले असता असलेला सावळेपणा हा त्वरित गायब होत असतो.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला काही अशाच उपायांविषयी सांगणार आहोत हे उपाय अगदी सोपे आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे घरी करू शकता. याद्वारे तुम्ही सावळ्या रंगापासून गोरे नक्की होऊ शकता. चला तर मग पाहूया काय आहेत हे सोपे घरगुती उपाय ज्याद्वारे तुम्ही तुमचा चेहरा उजळ करू शकता.

लिंबू:लिंबू हे फळ आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायी आहे लिंबाचा वापर सौंदर्य प्रसाधनांसाठी सुद्धा केला जातो. लिंबाचा थोडासा रस हा एका कापसावरील संपूर्ण चेहर्‍यावर लावला असता चेहऱ्यामध्ये एक वेगळीच चमक येऊ लागते. तुम्ही हातामध्ये लिंबू घेऊन थेट तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता.

लिंबामध्ये अँटी एक्सीडेंट व ॲन्टी एजिंग चे गुणधर्म सामावलेले आहेत. लिंबाचा वापर तुम्ही चेहऱ्यासाठी दिवसातून दोनदा तीनदा करू शकता. या साठी प्रति दिवस लिंबाचा वापर करायचा आहे. अगदी काही काळातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल.

हळद:तुम्ही अनेकदा ऐकले असेल की हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. हळदीमध्ये अँटी बॅक्टरियल गुण असतात. तुम्ही हळदीचा फेस पॅक देखील बनवून चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यावी लागेल व त्यामध्ये काही थेंब दूध टाकावे लागेल.

हे मिश्रण एकजीव केल्यानंतर चेहऱ्यावरती चोळून लावावे लागेल. हे कमीत कमी 15 मिनिटे ठेवल्यानंतर हलक्याशा कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकल्यास नक्कीच फरक जाणवेल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून किमान तीनदा करू शकता.
The post सावळेपणा कायमचा घालवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय…! appeared first on gavranmarathi.

काजल अडकली लग्न बेडीत, नववधूचे फोटो व्हायरल

Previous article

जर तुमच्या घरी लावलेले असेल हे झाडे तर तुम्हीही बनू शकता खूपच मालामाल जाणून घ्या कसे…!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.