Royal Entertainmentमुख्य बातम्या

शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत असेल तर आपल्या दररोजच्या जेवणामध्ये सामील करून घ्या हे पदार्थ…!

0

रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसतो त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण ने देखील बसत असतात. आरोग्याकडे व खाण्यापिण्याकडे लक्ष न दिल्यास हिमोग्लोबिनची कमतरता भासत असते.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. शरीरामध्ये पुरेसे रक्त नसेल तर चक्कर येणे, झोप न येणे, थकवा वाटणे यांसारख्या अनेक समस्या समोर येत असतात. या सोबतच अनेक गंभीर आजार होण्याची देखील शक्यता असते. याव्यतिरिक्त शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासल्यास शरीर हे पिवळे पडू लागते.

अशातच जर तुम्ही तुमच्या आधार रोजच्या दैनंदिन जीवनातील आपल्या जेवनामध्ये काही पदार्थ सामील करून घेतले तर रक्त कमतरतेच्या या समस्येला तुम्ही चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता. तुम्ही जर आम्ही सांगितलेले पदार्थ नियमित स्वरूपात खाणे सुरू केले तर रक्त कमी असण्याच्या सर्व समस्या दूर होऊन जातील.

पालक पनीर: शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता भासत असेल तर तुम्ही पालक पनीर ची भाजी खाणे खूपच गरजेचे आहे. पालक ही भाजी आरोग्यासाठी खूपच उत्तम असते. यामध्ये व्हिटॅमिन B6, A, C, आयरन, कॅल्शियम आणि फायबर हे सर्व सामावलेली असते, तुम्ही या भाजीचा ज्युस करून देखील घेऊ शकता.

टोमॅटोचे सेवन करावे:शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत असल्यास टोमॅटोची होईल तितक्या जास्त सेवन करावे. तुम्ही टोमॅटो कच्चे देखील खाऊ शकता, तसेच सलाद स्वरूपात देखील खाऊ शकता, तसेच टोमॅटो सूप किंवा ज्यूस बनवून देखील तुम्ही टोमॅटोला खाऊ शकता.

सफरचंद:सफरचंद हे फळ आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वपूर्ण मानले जाते. सफरचंदामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही बघितले असेल की डॉक्टर अनेकदा सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंदाच्या नियमित सेवनाने शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढत असते. या व्यतिरिक्त सफरचंदात विटामिन असतात जे तुमच्या शरीरात रक्त वाढीसाठी मदत करत असतात.

करावे पेरूचे सेवन:पेरू हे फळ सर्वांनाच आवडत असते, खाण्यास रुचकर लागणारे पेरू हे फळ जर नियमीत स्वरुपात खाल्ले तर खूपच चांगले आहे. शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता भासत असल्यास पेरू जास्त प्रमाणात खावा. पेरूमध्ये अनेक औषधी गुण असतात. जेवढा पिकलेला पेरू तितका तो पौष्टिक असतो. पेरूवर थोडेसे मीठ व लाल मिरची टाकून खाल्ल्यास पेरू खूपच सुंदर लागत असतो.
The post शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत असेल तर आपल्या दररोजच्या जेवणामध्ये सामील करून घ्या हे पदार्थ…! appeared first on gavranmarathi.

कोरोनायोध्द्या डॉक्टरांमधल्या ‘दैवी’रूपाला नवरात्री फोटोशूटव्दारे तेजस्विनी पंडितने दिला ट्रिब्यूट !!

Previous article

गायत्री मंत्र विषयीच्या ह्या अकरा गोष्टी माहित आहे का? माहित नसेल तर लगेच जाणून घ्या…! प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे…!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.