Royal politicsमुख्य बातम्या

शरद पवार गुरुवारी माढा दौऱ्यावर

0

सोलापूर 18 फेब्रुवारी (हिं.स) राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे २१ फेब्रुवारी रोजी माढा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पिंपळनेर (ता. माढा) येथील स्नेहल मंगल लॉन्स येथे दुपारी ३ वाजता माढा लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या माढा, करमाळा, माळशिरस व पंढरपूर या चार विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली.

या बैठकीस खा. विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके-पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या चारही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित रहावेत, असे आवाहनही त्यांनी केले

Loading...

पाकिस्तानी झेंडा जाळून रिक्षा युनियनने केला पुलवामा हल्ल्याचा निषेध

Previous article

शेतीच्या वादातून दिव्यांग शेतकऱ्याचा खून

Next article

You may also like

Comments

Comments are closed.