मुख्य बातम्या

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरुन चर्चा ! सरकार स्थापनेला पुन्हा नवं वळण…

0

टीम महाराष्ट्र देशा :- विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १२ दिवस उलटल्यानंतरही राज्यात अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. मात्र, आता राजकीय गोटामध्ये हालचालींना वेग आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली आहे. पवार यांच्या भेटीनंतर राऊत हे लागलीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहचले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या भेटीवर असताना आणखी एक मोठी बातमी येत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.या संदर्भात news 18 लोकमत या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. संजय राऊत यांनीच फोनवरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची चर्चा घडवून आणली आहे अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान,संजय राऊत यांनी शरद पवार यांची आज भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, , नेहमीप्रमाणे ही सदिच्छा भेट होती. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त केली. जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल दिल्यामुळे आपण विरोधी बाकावर बसणार असल्याचं पवारांनी सांगितल.’ अशा प्रतिक्रिया यावेळी दिली. यापूर्वी ३१ ऑक्टोबरला राऊतांनी पवारांची भेट घेतली होती. ही भेट फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतली असून यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याच राऊत यांनी सांगितलं होतं. आता मात्र सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने राऊत-पवारांची पुनर्भेटीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

अशातच शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असताना शिवसेनेकडे अनेक पर्याय असल्याचं राऊत म्हणत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मदत करण्यास सकारात्मक असल्याचीही चर्चा होताना दिसत आहे. अशा सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पुन्हा शरद पवारांची भेट घेणं भुवया उंचावणारं आहे.

अवघ्या 25 वर्षाच्या कल्याणीला चंद्रकांत पाटलांनी चक्क अब्रूनुकसान भरपाईची नोटीस पाठवली, मुलगी म्हणून त्रास देण्याचा प्रयत्न !

Previous article

‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.