टॉप पोस्टमहाराष्ट्रमुख्य बातम्याराजकारण

व्हिडिओ क्लिप प्रकरण : नेमकं काय खोटे आणि काय खरं ?

0

धनंजय मुंडे यांची जी बदनामी सुरु आहे, तो फक्त रडीचा डाव आहे. मी पत्रकार म्हणुन अनेकदा धनंजय मुंडे यांना भेटलो, बोललो. पंकजाताईंविषयी त्यांच्या मनात कधीच द्वेष दिसला नाही. सख्ख्या भावाला आपल्या बहिणीविषयी जेवढं प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाला असतो, त्यापेक्षा किंचितही कमी जाणवला नाही. उलट कणभर का होईना जास्तच आहे.

एक किस्सा अजुनही माझ्या चांगला स्मरणात आहे.

Loading...

2014 ची विधानसभा निवडणुक होऊन विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी धनंजय मुंडे यांची निवड झाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे औरंगाबादला आले होते. त्यांचे नियोजित कार्यक्रम झाल्यावर सुभेदारी विश्रामगृहावर काही निवडक पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा सुरु होत्या. एका वरिष्ठ पत्रकारांच्या तोंडून पंकजाताईंविषयी “आयत्या बिळावरील……’ हे वाक्य आलं आणि धनंजय मुंडेंचा पारा चढला. तो पत्रकार वरिष्ठ आणि एका मोठ्या दैनिकाचा होता. मात्र, तो कोण याचा क्षणभर विचार न करता धनंजय मुंडे यांनी त्या पत्रकाराच्या घरच्यांचे संस्कार काढत ‘उध्दार’ केला. त्याचवेळी बहिणीप्रती प्रेम, आपुलकी दिसली. जे धनंजय मुंडेंना जवळुन ओळखतात, ते सांगु शकतील कि, त्यांनी काय स्वरुपाचा उध्दार केला असेल.

त्या पत्रकारास तिथुन काढुन दिल्यानंतर इतरांनी धनंजय मुंडेना शांत केलं. तेव्हा ते जे बोलले, ते अक्षरशा डोळ्यात पाणी आणणारं होतं. ते म्हणाले, “ज्या दिवशी मी पंकजाताईच्या विरोधात पहिली सभा घेतली, त्या रात्री माझ्या डोळ्यातलं पाणी रात्रभर वाहतच होत, मी खुप प्रयत्न केला, डोळ्यातील धारा थांबवण्याचा, मात्र झोपही येत नव्हती आणि डोळ्यातील पाणी ही थांबत नव्हतं, फक्त पंकजाताईचा.. माझ्या बहिणीचा.. निरागस चेहरा आणि मुंडे साहेबांचे विचार डोक्यात काहुर घालत होते. आई, बायको जवळ बसून होत्या. त्यासारखं विचारत होत्या. काय झालं? का रडताय? जेवुन घे मात्र कशातच मन रमत नव्हतं.”

हे सर्व ते आम्ही चार पाच लोकांसमोर सांगत असतांनाही धनंजय मुंडे यांचे डोळे डबडबळेले होते. याचवेळी ते डोळ्यातली आसवं बाहेर न येऊ देण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत होते.
मात्र, जेव्हा स्वकियांसोबत राजकीय संघर्ष हा अपरिहार्य असतो, तेव्हा तो करावाच लागतो. आणि धनंजय मुंडे हे अतिशय संस्कारी पध्दतीने करताना दिसतायत. त्यांची कार्यकर्त्यांविषयीची आपुलकी, जिव्हाळा आणि उपलब्धता ही नक्कीच स्तुती करण्यासारखा विषय आहे. त्यांचे विरोधकदेखील ही गोष्ट मान्य करतात. कोणत्याही संकटात, अडी-अडचणीत, रात्री अपरात्री धनुभाऊ हाकेला ओ देतात. (मोबाइलवर चोवीस तास, ३६५ दिवस कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असतात)

महाराष्ट्रभर फिरत असतानाही त्यांनी मतदारसंघात अतिशय चांगला संपर्क ठेवला. यामुळे कार्यकर्त्यांचे मजबूत असे संघटन आज मतदारसंघात आहे. याचमुळे पंकजाताईला ही निवडणुक जड जाताना दिसतेय. यावर शेवटचा एक उपाय शिल्लक होता म्हणजे भावनिक काहीतरी केल्याशिवाय विजय अशक्य आहे. त्याच मजबुरीतुन कालचा ( शनिवार, ता. 19) चा नियोजित डाव धनंजय मुंडे विरोधकांनी सुरु केल्याच दिसतयं. बाकी मोठ्या साहेबांच्या प्रेमापोटी एक कार्यकुशल, संघर्षशील, सदैव मदतीला धावुन येणारे धनंजय मुंडेवर जनता पुन्हा अन्याय करणार का? हे येत्या २४ तारखेला कळेलचं.

निवडणुका येईल जातील, जय पराजय सुरुच राहतील. मात्र राजकारणासाठी खोटी महिती पसरवून बहीण भावाच्या नात्यात विष कालवणाऱ्यांनी विचार करावा, एवढेच.

एक मात्र खर आहे , धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघींची ही बहुजन राजकारणासाठी आणि विशेषत मराठवाड्याला गरज आहे, दोघांपैकी एकाने दुसरा मतदार संघ निवडावा आणि दोघांनीही विधानसभेत असावा ही माझी वैयक्तिक इच्छा आहे.

– संतोष आदमाने
संपादक – ए. आय. एन. न्युज टीव्ही चॅनल
www.ainnews.tv

Loading...

आदित्य ठाकरेला पाडा, भाजप आयटी सेल कडून फेसबुकवर प्रचार.

Previous article

राष्ट्रवादी जादुई आकडा गाठणार, एक नंबरला राहण्याची शक्यता !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.