मुख्य बातम्या

राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केलाय !

0

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असून आमदारांना फोडाफोडीसाठी संपर्क केला जात असल्याचा आरोप होत आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चिमटे काढले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आपापल्या घरी आहेत, कारण त्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केला आहे, असं ट्वीट आव्हाडांनी केलं आहे.

शिवसेना आमदार – रंगशारदा, काँग्रेस आमदार – जयपूर, राष्ट्रवादी आमदार – आपआपल्या घरी, कारण सगळ्यांना उदयन राजेंचा फोटो मेसेज करून ठेवलाय. हा मेसेज करणाऱ्याला सलाम’ असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. सोशल मीडियावर फॉरवर्ड झालेला मेसेज आव्हाडांनी शेअर केलेला दिसत आहे.

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना रंगशारदाला बोलावलं असून तिथून सर्व जण एकत्र एखाद्या ठिकाणी रवाना होणार आहेत. तर काँग्रेसचे आमदारही जयपूरला गेल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे आमदार एखाद्या अज्ञातस्थळी गेल्याचं मात्र कोणतंही वृत्त नाही.

जे आमदार फुटायचे होते, ते निवडणुकीआधीच गेले. आता राष्ट्रवादीला आमदार फुटण्याची भीती नाही, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं होतं.

राष्ट्रवादीच्या तिकीटावर साताऱ्यातून खासदारपदी निवडून आलेल्या उदयनराजेंनी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपच्या गोटात सहभागी झाले. परंतु पोटनिवडणुकीत जनतेने त्यांना नाकारलं. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील साताऱ्याच्या खासदारपदी निवडून आले असून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे उदयनराजेंसोबत जे घडलं, ते आपल्यासोबत होऊ नये, या भीतीतून एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासच एकप्रकारे आव्हाडांनी फॉरवर्ड मेसेज पोस्ट करत व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग : मी पुन्हा येईन अशी डरकाळी फोडणारे मुख्यमंत्री उद्या राजीनामा देण्याची शक्यता ?

Previous article

मोठी बातमी- शरद पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Next article

You may also like

Comments

Comments are closed.