Royal Entertainmentमुख्य बातम्या

रात्रभर झोपूनही, चांगला आराम करूनही येत असेल थकवा तर आहेत ही कारणे !

0

दिवसभराच्या या धावपळीच्या काळामध्ये माणसाला खूपच थकवा येत असतो. अनेकदा कामाच्या खूप व्यापामुळे तणाव देखील निर्माण होत असतो व यामुळे डोकेदुखीचा त्रास देखील होत असतो. तसेच थकवा देखील येत असतो. परंतु दिवसाच्या सुरुवातीपासून रात्री झोपण्यापर्यंत थकवा येणे ही बिलकुल सामान्य बाब आहे. अनेकदा झोप पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थकवा येत असतो.

कारण दिवसभर आपण काम करतो पण आराम करत नाही. त्यामुळे थकवा आणखीनच वाढत जातो. परंतु असे देखील होत असते की आपण चांगल्या प्रकारे झोप घेऊनही तरीदेखील आपण थकलेलो दिसत असतो. तर यामागे अनेक प्रकारचे कारण असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या मागे असलेले काही कारणे.

जर तुम्हाला प्रत्येक वेळी थकवा येत असेल तर याचे मुख्य कारण आहे तुमच्या खाण्यापिण्यातील महत्त्वपूर्ण पोषकतत्वा ची कमी असणे. उदाहरणासाठी आपण पाहिले तर दिवसभरामध्ये योग्य कॅलरी आणि कार्बोहाइड्रेट असलेले खाद्य पदार्थांचे सेवन शरीरासाठी खूपच महत्वपूर्ण असते. कारण या पोषक तत्वामुळे शरीराला योग्य ती ऊर्जा मिळत असते. यासाठी ब्राउन राईस, फळे, फळभाज्या, हॉट मिल्स यांचे सेवन करावे.

जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत नसाल तर शरीर योग्य प्रकारे हायड्रेट होत नाही आणि यामुळे देखील तुम्ही थकलेले दिसत असता. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूपच जास्त पाणी प्यावे. प्रत्येक व्यक्तीने दिवसभरामध्ये आठ ते दहा ग्लास पाण्याचे सेवन करायला हवे. असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. पाणी एकदाच तोंडाला लावून घट घट पिऊ नये. पाणी ग्लासामध्ये घेऊन जमिनीवरती बसून हळूहळू प्रमाणात तोंडात सोडावे.

अनेक लोक दिवसभर थकवा आल्यानंतर रात्री थेट जाऊन झोपतात व सकाळी उठून पुन्हा कामावर जात असतात. यामुळे देखील थकवा वाढण्याचे प्रकार घडत असतात. असे करण्याऐवजी तुम्ही दररोज सकाळी थोडासा व्यायाम व जेवणानंतर शतपावली व सकाळी जॉगिंग करायला हवी. यामुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहते आणि भरपूर ऊर्जा देखील मिळत असते.

अनेक लोकांना खूपच वाईट सवय असते ती म्हणजे रात्र भर जागण्याची. तरुण मुले तर संपूर्ण रात्रभर जागत असतात व मोबाईल मध्ये गेम्स खेळत असतात. तसेच अनेक लोक देखील रात्रभर चित्रपट बघण्यात उशिरापर्यंत जागरण करत असतात. खरतर योग्य प्रमाणात झोप ना घेतल्यामुळे मानसिक, शारीरिक व भावनात्मक आरोग्यावर नकरात्मक असर पडत असतो. यांसारख्या समस्यांचा पासून वाचण्यासाठी दररोज आठ ते नऊ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
The post रात्रभर झोपूनही, चांगला आराम करूनही येत असेल थकवा तर आहेत ही कारणे ! appeared first on gavranmarathi.

हे’ नुकसान टाळण्यासाठी तुमची जीन्स धुवा महिन्यातून एकदाच !

Previous article

महानायकाची लव्ह मिस्ट्री

Next article

You may also like

Comments

Comments are closed.