Royal Entertainmentमुख्य बातम्या

या वर्षीच्या दिवाळीतील लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी, भाऊबीजचा हा शुभ मुहूर्त तुम्हाला माहित असायलाच हवा नाहीतर होईल..

0

royalmarathi.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाइक करा.. ओम नमो नारायणा. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो दोनहजार वीस या सालातील दिवाळी ही कधी आहे.सोबतच धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी , वसुबारस, लक्ष्मीपुजन, भाऊबीज अगदी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. विशेष करून लक्ष्मीपुजनाच्या बाबतीत अनेकजण गोंधळले आहेत.

कारण अमावस्या दोन दिवस आहे आणि मग चौदा नोव्हेंबर की पंधरा नोव्हेंबर. नक्की लक्ष्मीपुजन कोणत्या दिवशी केलं जाईल.अगदी शास्त्रोक्त माहिती आज आपण पाहणार आहोत. दरवर्षी शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी अश्विन आणि कार्तिक महिन्याच्या संधी काळात दिवाळीचा सण आपण साजरा करतो.

हिंदू पंचांगानुसार अश्विन मध्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध व्दितीय दरम्यान दिवाळी म्हणजे दीपोत्सव साजरा होतो. यावर्षी ची दिवाळी नोव्हेंबर महिन्याच्या मध्यात आलेली आहे. आता दिवाळी म्हणजे नक्की काय तर वसुबारस पासून ते भाऊबीज पर्यंत जो पाच दिवसांचा सण आपण साजरा करतो त्यालाच दिवाळी किंवा दीपोत्सव असे म्हंटले जाते.

मित्रांनो ज्या दिवशी लक्ष्मीपुजन असते त्या दिवशी केवळ माता लक्ष्मीची नव्हे तर सोबत भगवान कुबेरांची आणि गणपती बाप्पाची सुद्धा पूजा अवश्य करावी. जेणेकरून जीवनात सुख समृद्धी येईल. चला तर जाणून घेऊयात की दोन हजार वीस मध्ये दिवाळी नक्की कोणत्या दिवशी साजरी होईल. मित्रांनो बारा नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी म्हणजेच हिंदू पंचांगा नुसार अश्विन कृष्ण दुवादशीस वसुबारस साजरी होणार आहे.

या वसुबारस पासूनच दिवाळीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार तेरा नोव्हेंबर रोजी हिंदू पंचांगानुसार निज अश्विन कृष्ण प्रयोगदशीस धनत्रयोदशी आपण साजरी करणार आहोत. यालाच हिंदीत धनतेरस असेही म्हंटले जाते. मित्रांनो त्या नंतर शनिवार चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी नरकचतुर्दशी साजरी केली जाईल.

हिंदू पंचांगानुसार निज अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरकचतुर्दशी साजरी होणार आहे. आणि मित्रांनो याच दिवशी म्हणजेच चौदा नोव्हेंबर शनिवार च्या दिवशी लक्ष्मीपुजन आपण करणार आहोत. तिथी आहे निज अश्विन अमावस्या. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की हाच दिवस का पंधरा नोव्हेंबर ऐवजी चौदा नोव्हेंबर रोजीच आपण लक्ष्मीपुजन का करावं.

मित्रांनो याच कारण अस आहे. ही जी अमावस्या आहे ही शनिवारी चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजून अठरा मिनिटांनी प्रारंभ होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांनी या तिथीची समाप्त होत आहे. अमावास्या संपत आहे.

आणि मग तर आपण शास्त्राचा विचार केला तर भ्रम पुराणात असा उल्लेख आहे की अश्विन अमावशेच्या दिवशी मध्य रात्री माता लक्ष्मी या भूतलावर येऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. आणि म्हणून भ्रमपुराणा नुसार चौदा नोव्हेंबर शनिवार चा दिवस हा लक्ष्मी पुजनासाठी अतिउत्तम दिवस मानला जाईल.

आता जर वेळेचा विचार केला शुभमुहूर्ताचा विचार केला. तर लक्ष्मीपुजनाचा शुभ मुहूर्त शनिवार चौदा नोव्हेंबर रोजी अमावस्या सायंकाळी पाच वाजून आठ्वण मिनिटांनी याच दिवशी रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यत असणार आहे. म्हणजे साधारण अडीच तासाच्या कालावधीत आपण लक्ष्मीपुजन करावं हे अत्यंत शुभ मानलं जाईल.

त्यानंतर पंधरा नोव्हेंबर तारखेला अमावास्याच असणार आहे. सोळा तारखेला सोमवारच्या दिवशी बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा साजरा होणार आहे. हिंदू पंचांगानुसार दिवस आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा. आणि मित्रांनो याच दिवशी म्हणजे सोमवारी सोळा नोव्हेंबर रोजी यमद्वितीय म्हणजेच भाऊबीज सुद्धा साजरी होईल.

तिथी आहे कार्तिक शुद्ध त्रितीया. तर मित्रांनो वेळो वेळी आम्ही अश्याच महत्वपुर्ण माहिती या पेज वर देणार आहोत. म्हणूनच विनंती आहे कि पेजला लाइक करा आणि पोस्टला सुद्धा लाइक करा. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

ह्या राशीच्या लोकांनी खूप बघितले गरिबीचे दिवस, आता सुरुवात होईल श्रीमंतीला सुखी दिवसांना

Previous article

व्हाट्सअप चॅट पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जाऊ शकतो का ? जाणून घ्या काय सांगतो कायदा !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.