मुख्य बातम्या

फडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट !

0

सत्ता स्थापणेपूर्वी महाराष्ट्रात राजकीय वातावरण प्रचंड तापल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रभरातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला प्रचंड विरोध होत आहे.

सहयोगी पक्ष शिवसेनाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यास अजिबात अनुकूल दिसत नाही. त्यांचे पूर्वीचे सहकारी विनोद तावडे, एखनाथ खडसे हे देखील त्यांच्या सोबत नाहीत असेच चित्र दिसतेय.

त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची आयटी सेल मोडकी कुबडी घेऊन त्यांचे समर्थन करताना आज दिसली, त्यांनी Devendra Fadnavis For Maharashtra या पेजवरून “आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करणार ” असा पोल पोस्ट करण्यात आला होता, त्या खाली पर्याय होते 1) देवेंद्र फडणवीस आणि 2) इतर कोणीही.

तर जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला फक्त 38% कौल दिला तर इतर कोणीही या पर्याया पुढे 62% कौल दिला. एकूण 40 हजार लोकांनी तिथं vote केलं होतं.

त्यामुळे आपल्या नेत्याची बदनामी होईल म्हणून सदरील पोस्ट फडणवीसांच्या टीम कडून डिलीट करण्यात आला. दरम्यान सोशल मीडियात फडणवीस तोंडावर आपटले अशी जोरदार चर्चा आहे.

पोस्ट चा स्क्रीन शॉट ⬇️

‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’

Previous article

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही : संजय राऊत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.