मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात पुन्हा ‘दादागिरी’चं चालणार, अजितदादा होणार पालकमंत्री !

0

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाल्यानंतर आता राज्यात अखेर शिवसेना,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत महाशिव आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. आता राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या संयुक्त आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर , पुणे जिल्ह्यात या तीनही पक्षांचा प्रत्येकी किमान एक मंत्री असणार आहे. यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), आमदार संग्राम थोपटे (काँग्रेस) यांची नावे आघाडीवर आहेत. पुणे शहर व जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार नसल्याने, पक्षवाढीसाठी एक मंत्री देण्याचे सेनेचे धोरण असणार आहे.

यासाठी पुन्हा विजय शिवतारेंना संधी मिळणार की, ऐनवेळी शिवाजीराव आढळरावांना संधी मिळणार, याचीच चर्चा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये रंगू लागली आहे. दरम्यान, पाच वर्षाच्या खंडानंतर अजित पवार पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाल्यानंतर त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर सलग १५ म्हणजेच २०१४ पर्यंत आघाडी सरकार सत्तेत होते. या पंधरा वर्षातील तीन महिन्यांचा अल्प काळ उर्वरीत सर्व काळ अजित पवार हे पालकमंत्री होते. भाषणातील एका असंसदीय शब्दामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या या राजीनामा कालावधीत मुंबईचे सचिन अहिर हे पुण्याचे पालकमंत्री झाले होते. आघाडीचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने सत्तांतर झाले आणि सत्तांतरानंतर भाजपचे गिरीश बापट जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.

दरम्यान, जिल्ह्यात शहर, जिल्ह्यात काँग्रेसचे दोनच आमदार आहेत. त्यात भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप यांचा समावेश आहे. जगताप हे पहिल्यांदाच निवडून आले असून थोपटे सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार थोपटे यांचे नाव अग्रक्रमाने राहणार आहे. माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे थोपटे यांचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर झाला आहे.

अचानक विधानभवनातून “या” कारणामुळे सुप्रिया सुळे पळत बाहेर गेल्या !

Previous article

ठाकरे घराणे ब्राह्मण नसून हा आहे त्यांचा खरा इतिहास ; वाचा सविस्तर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.