मुख्य बातम्या

‘पवारांनी पुढाकार घेतलाय; आता भाजपचा विषय संपलाय’

0

मुंबई : भाजपचे हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात जमीन आसमानचा फरक आहे. मागील पाच वर्षात राज्याला भाजप अधोगतीकडे घेऊन गेला. निवडणुकीआधी जनतेला फसवण्यासाठी भाजपचे नेते २२० – २५० जागा येणार सांगत होते. निकालामध्ये मात्र जनतेने त्यांना नाकारलं आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार नको, अशी भूमिका कॉंग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी मांडली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर दलवाई माध्यमांशी बोलत होते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक झाली होती. मात्र, संख्याबळाचा निश्चित अंदाज नसल्याने काँग्रेस द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, दलवाई आणि राऊत यांच्यातील भेटीनंतर वारे पुन्हा वेगळ्या दिशेला वाहू लागले आहेत.

आज संध्याकाळी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस नेतृत्त्वाकडून हुसेन दलवाई यांच्यामार्फत शिवसेनेला निरोप पाठवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता आणखी काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरुन चर्चा ! सरकार स्थापनेला पुन्हा नवं वळण…

Previous article

फडणवीसांच्या पेजवर टाकलेली ती पोस्ट केली डिलीट !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.