मुख्य बातम्या

पवारांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार; ‘या’ भाजप नेत्याने व्यक्त केला विश्वास

0

देशातील पोलीस महासंचालक परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी पुण्यात आगमन झाले. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे पुणे विमानतळावर आले होते. त्यानंतर प्रसार माध्यमाशी संजय काकडे यांनी संवाद साधला.

यावेळी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे म्हणाले, ‘राज्यात तीन पक्ष एकत्रित येऊन, सत्ता स्थापन झाली आहे. यामुळे हे सरकार टिकेल, त्यांना टिकवावं लागेल, असे काकडे यावेळी बोलताना म्हणाले. काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Loading...

पुढे बोलताना ते म्हणाले की, यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येत, सत्ता स्थापन केली. त्या प्रमाणे शरद पवार यांनी १९८९ ला असे सरकार चालवले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लिन चीट देण्यात आली, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला असता. काकडे म्हणाले, राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील असे मला वाटत नाही, असे काकडे म्हणाले.

Loading...

‘मेगाभरती’नंतर भाजप अनुभवणार ‘मेगागळती’, हे आमदार राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत !

Previous article

नगरमध्ये विखेंच्या सत्तेला सुरुंग, आता चालणार पवार-थोरातांचा शब्द

Next article

You may also like

Comments

Comments are closed.