टॉप पोस्टट्रेंडिंगमुख्य बातम्या

निवडणुकीत सभांचा धुरळा उडवणाऱ्या मिटकरींवर राष्ट्रवादीने सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

0

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त यश मिळालं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या झंझावतामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस यश मिळू शकली आहे. त्याच बरोबर खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटीकरी यांच्या तडफदार भाषणाची देखील विधानसभा निवडणुकित कमालीची चर्चा झाली. आता यामुळेच राष्ट्रवादीने अमोल मिटीकरी यांच्यावर पक्ष वाढीची जबाबदारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत ‘आम्हाला सभेसाठी अमोल कोल्हे आणि अमोल मिटीकरी यांच्यापैकी एक तरी अमोल द्या’, अशी मागणी आघाडीचे उमेदवार करत असल्याची माहिती खुद्द राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यामुळे कोल्हे यांच्यासह अमोल मिटकीरी यांची लोकप्रियता अधोरेखित होत आहे. आता याच लोकप्रियतेचा पक्षाला उपयोग करून घेण्यासाठी आणि पक्षात नवसंजीवनी आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या समन्वय पदी नियुक्ती केली आहे. यामुळे नक्कीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवभरारी घेईल अस बोललं जातं आहे…

Loading...

दरम्यान पक्षाने आज माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक विभागाच्या अत्यंत महत्वाच्या राज्य समन्वयक पदी निवड करून मला महत्वपूर्ण जवाबदारी दिल्याबद्दल, मी सर्व पक्षाचे, पक्ष श्रेष्ठींचे व महाराष्ट्रातील तमाम तरुणांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र भर लवकरच आणखी ताकदीने पक्ष संघटना मजबुत करण्याची आपणास ग्वाही देतो, असे उद्गार नियुक्ती नंतर अमोल मिटीकरी यांनी काढले आहेत.

Loading...

आणि शरद पवारही म्हणाले “मी पुन्हा येईल” पहा -video

Previous article

अखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.