महाराष्ट्रमुख्य बातम्याराजकारण

नगरमध्ये विखेंच्या सत्तेला सुरुंग, आता चालणार पवार-थोरातांचा शब्द

0

लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जागेवरून संघर्ष निर्माण झाला अन त्यातूनच नगरचे सत्ताकेंद्र असलेल्या विखेंच्या घरातून कॉंग्रेसला पहिला धक्का देत सुजय विखेंच्या रूपाने पहिली गळती लागली त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये सामील झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांना आता अहमदनगर जिल्ह्यात धक्के बसण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्यात असलेल्या विखे कुटुंबाच्या सत्तेला आता सुरुंग शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 जागा जिंकून देईल अशी भीष्मप्रतिज्ञा विखे-पाटील यांनी केली होती. पण झाल मात्र याउलटच. काँग्रेस-राष्ट्रवादीने शानदार पुनरागमन करताना नगर जिल्ह्यात 9-3 अशा जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व वाढले आहे.

Loading...

नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे आहेत. मात्र पती आणि मुलगा भाजपमध्ये गेल्यामुळे शालिनीताई अध्यक्षपदावर राहतील याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी थोरात कोणाची वर्णी लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच रोहित पवार यांची नगर जिल्ह्यात दमदार एंट्री झाली आहे. नगरमध्ये राष्ट्रवादीचे 19 सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या रोहित पवारांना देखील महत्त्व मिळणार आहे. येणाऱ्या काळात थोरात-पवार यांचाच शब्द नगरमध्ये चालणार यात तिळमात्र शंका नाही.

नगर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 73 आहे. त्यात डॉ. किरण लहामटे आमदार झाल्याने आता सदस्य संख्या 72 वर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 23, राष्ट्रवादीचे 19, भाजप 13, शिवसेना 7, क्रांतीकारी शेतकरी पक्ष (जो आता शिवसेने सोबत आहे ) 5 आणि इतर 5 सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास, अध्यक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा होऊ शकतो. आणि जर महाविकास आघाडीचे समीकरण जर नगरमध्ये जुळून आल्यास विखेंची सत्ता जाणार हे मात्र नक्की.

Loading...

पवारांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सरकार ५ वर्षे टिकणार; ‘या’ भाजप नेत्याने व्यक्त केला विश्वास

Previous article

‘2024 मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होणार’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.