Royal Entertainmentमुख्य बातम्या

जेव्हा मुलीच्या सासूने घरातील मोलकरणीवर चोरीचा आळ घेतला तेव्हा पहा आईने काय केले, जाणून तुम्हाला धक्काच बसेल

0

royalmarathi.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. नमस्कार,आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हृदयस्पर्शी कथा. कथेचं नाव आहे “मोलकरीण”. आणि लेखन केले आहे सायली कुलकर्णी म्याडम यांनी. चला तर मग कथेला सुरवात करू…. नीरजाच लग्न अगदी चार दिवसावर आलं होत, कुंदा मावशी आपल्या लेकीचं लग्न असल्यासारखे सगळं जीव लावून करत होत्या. नुसती धावपळ चालू होती.

त्यांची, आला -गेला, पावणा- रावला, सगळं मालकीण बाईच्या बरोबरीनं कुंदा मावशी करत होत्या. कोणाला काय हवं नको हे सगळं पुढे होऊन करत होत्या. तस देशमुख परिवाराशिवाय त्यांना तरी कोण होतं. नवरा अर्ध्यावर संसार टाकून निघून गेला आणि पोटच्या पोराची माया आटली. एकट्या पडल्या होत्या. पण मग देशमुख परिवाराने त्यांना आश्रय दिला. राहायला खोली दिली. त्या गोष्टीला पण पंधरा वीस वर्ष झाली असतील. कुंदा मावशी त्यांच्या घरातल्याच होऊन गेल्या.

देशमुख बाईना पण कुंदा मावशीचा आधार वाटायचा. या वयात पण त्यांचा कामाचा झपाटा आणि उचाह पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटायचे. पाहता पाहता लग्नाचा दिवस आला. कार्यालयात पोचताच निर्ज्याच्या आईनं नावरीमुलींच्या खोलीची किल्ली कुंदा मावशीकडे सोपवली. त्याच्यावर ओघानेच महत्वाची जबाबदारी दिली . “निरजाच्या सासरच्यांनी निरजाला दिलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू आणि काही रोकड अशी काही महत्वाची एक बॅग आपण त्या खोलीत ठेवल्याचा.

निरजाच्या आईने कुंदा मावशीला सांगितले होते”. कुंदा मावशी जवळपास जीवच रान करून त्या खोलीला जपत होत्या. इकडे लग्न लागलं आणि जेवणाच्या पंगती उठू लागल्या. यथावकाश नीरजा जय देशमुख आणि त्यांचे व्याही पाटील जेवायला बसले. शेवटची पंगत पार पडली आणि नीरजा सासरी जायची वेळ झाली सगळ्या देशमुखांची लाडकी राजकुमारी आता पाटलांच्या घराची राणी झाली होती. डोळ्यातल्या अश्रूना कसाबसा थोपवत लेकीची पाठवणी झाली. आणि सगळे घरी परतले.

घरी येऊन तास भरच झाला असेल आणि नीरजाच्या सासर वरून फोन आला. ‘की नीरजाला दिलेली दागिन्यांची बॅग गायब आहे म्हणून’, देशमुख बाईना तर पायाखालची जमीन सरकते की काय असेच वाटले. देशमुख बाई म्हणाल्या, “नीट बगा एकदा असेल तेथचं कोठे तरी”. त्यावरून पलीकडून पाटील वहिनी म्हणाल्या, “सगळं बगून झालं हो आमचे,हे तर परत कार्यालयात पण जाऊन बगून आले. लग्नात चोरी झाली वाटत. तुमच्या त्या नोकरणीला विचारा ती तुमच्या घरातली नोकरणी.

नीरजाच्या खोलीच्या आसपासच फिरताना दिसली मला बऱ्याच वेळा”. आतापर्यंत सगळं शांत पणे ऐकून घेणाऱ्या देशमुख बाईचा आता मात्र स्वतःवरचा ताबा सुटला. “पाटील वहिनी शब्द जरा जपून वापरा,माझी लेक माझ्या काळजाचा तुकडा दिला आहे मी तुम्हला, त्यामुळे मी आतापर्यंत ऐकून घेतलं सगळ,पण कुंदा मावशीला तुम्ही अस बोललात ते साफ चूक आहे. कुंदा मावशी मोलकरीण नसून या घराची येक भाग आहे.आणि त्या हे करणं शक्य नाही याची मी शासवती देते”.

हे बोलणं होत ना होतं एवढ्यात पाटीलांच्या घरात कसला तरी गलका झाला. जरा वेळानं फोन करते म्हणत पाटील बाईनी फोन बंद केला . तिकडे जयची काकू धावत आली होती. तिला ती दागिन्यांची बॅग मिळाली होती. एकसारख्या दिसणाऱ्या दोन बॅग नीरजाच्या खोलीत होत्या त्यातील एक कपड्यांची होती आणि ही दागिन्यांची. चुकून बॅग उचलताना अदलाबदल झाली आणि त्यामुळे हा सगळा गोधळ झाला होता. आता हे एवढ रामायण ऐकून पाटील बाई खजिल झाल्या होत्या.

नीरजाच्या आईला बोललेलं एक एक शब्द त्यांना आता सलत होता. पुढचा मागचा विचार न करता आपण कोणाला आणि किती बोलून गेलो याची जाणीव होऊन त्यांच्या डोळ्यात आता अश्रू आले होते. तसेच त्यांनी पायात चपला सरकवल्या त्या आणि मिस्टर पाटील दहाव्या मिनिटाला नीरजाच्या माहेरी हजर होते. त्यांनी गेल्या गेल्या देशमुख बाईची झाल्या प्रकरणाबद्दल क्षमा मागितली.”आपलंच चुकलं आपण कशाचीच शहा निशा न करता निरपेक्ष पणे देशमुख.

परिवारावर प्रेम करणाऱ्या कुंदा मावशीवर संशय घेतला. त्या साठी माफ करा”. अस म्हणत पाटील वहिनी रडू लागल्या. अहो रडू नका,पाटील वहिनी: कुंदा मावशींना यातला काहीच माहीत नाही. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. यातलं काही त्यांना कळता कामा नये नाहीतर खूप जीवाला लावून घेतील त्या. त्यांच्या वतीने मी तुम्हला माफ करते. देशमुख बाईनी त्यांना समजवले. त्यांना शांत केलं. पाणी दिल. हा सगळा प्रकार कुंदा मावशी दारा आडून पाहत होत्या. आपल्या वरील.

एवढा मोठा गंभीर आरोप झालाय. चोरीचा आळ आपल्यावर आला तरी मालकीण बाईनी आपल्या साधं कानावर पण नाही येऊ दिल. किती हा विश्वास आपण खाल्या मिठाला जागलो. तर मालकीण बाई आपल्यावरील प्रेमाला कुंदा मावशी गहिवरून गेल्या होत्या. नकळत पणे त्यांनी डोळ्याला पदर लावला अचानक घोगावत आलेलं वादळ शांत झालं होत. आणि स्वछ नवीन वाट दिसू लागली होती. मित्रांनो तुम्हला हि माहिती कशी वाटली आम्हला नक्की कळवा.

ऐश्वर्यापेक्षाही जास्त सुंदर आहे तिची ‘वहिनी’, जणू काय सौंदर्याची खाणंच, पहा हॉट आणि बोल्ड फोटो

Previous article

नवरात्री विशेष: सिंधूताईंच्या उर्जेला माझा सलाम!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.