राजकारण

मी भाजपचा राजीनामा का देत आहे

0

देशात राजकीय संवादाने खालचा तळ गाठला आहे.कमीत कमी माझ्या वेळेत तर नक्कीच. भेदभाव अविश्वसनीय आहे. कोणतेही सत्य माहीत नसताना ही लोक स्वतच्या पक्षांच्या बाजूने समर्थन देतात. फेक न्यूज प्रसारित केले जात असल्याचे समजल्यावर देखील त्यांना त्याचा पश्चाताप होत नाही. याच्यासाठी प्रत्येकजण- पक्ष, मतदार/समर्थक दोषी आहेत.

काही विशिष्ट संदेश प्रभावी प्रोपगंडाच्या माध्यमातून प्रसारित करण्याचे सर्वोत्तम काम अविश्वासनिय पद्धतीने भारतीय जनता पक्ष  करीत आहे आणि हेच मुख्य कारण आहे की मी यापुढे पक्षाला माझे समर्थन देऊ शकत नाही. परंतू यापूर्वी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचण्याआधी मला प्रत्येकाला समजावून सांगावे वाटते की, कोणताही पक्ष पूर्णपणे वाईट नसतो आणि कोणताही पक्ष पूर्णपणे चांगलाही नसतो. सर्वच सरकारांनी काही तरी चांगले काम केले आहे तर काही बाबतीत वाईट काम देखील केले आहे. हे सरकार देखील काही वेगळे नाही.

चांगल्या गोष्टी-
Loading...

1. रस्त्यांचे बांधकाम पूर्वीपेक्षा अधिक वेगाने झाले आहे. रस्त्याच्या मोजणीची मोजमाप पद्धत बदलली आहे. असे असले तरीही रस्त्याच्या कामांना वेग आला आहे.

2. वीज जोडणीच्या प्रमाणात वाढ- सर्व गावांना वीज मिळाली आहे आणि लोकांना जास्त तास वीज मिळत आहे. (कॉंग्रेसने 5 लाख गावांपर्यंत वीज पोहचवली होती आणि मोदींनी शेवटच्या 18 हजार गावांना जोडणी देऊन आपले काम संपवले, तुम्ही या यशाचे मोजमाप तुमच्या पद्धतीने करू शकतात. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतर लोकांना मिळणार्‍या विजेच्या तासांमध्ये वाढ झाली, परंतू कदाचित तुम्ही पहिले असेल की, भाजपच्या काळात यामध्ये मोठी वाढ झाली आहे.)

3. उच्च पातळीवरील भ्रष्टाचार कमी झाला- सद्यस्थितीत मंत्रिमंडळाच्या पातळीवर कोणतेही मोठे प्रकरण नाही. (पण यूपीए 1 बाबत देखील असेच होते) खालील पातळीवर देखील या गोष्टी मोठ्या प्रमाणात सारख्याच आहेत. ठाणेदार आणि पटवारी यांना नियंत्रित करणारे कोणी नाही.

4. स्वच्छ भारत अभियान हे निश्चित यशस्वी झाले आहे. पूर्वीपेक्षा अधिक शौचालय बांधण्यात आले आहेत. आणि आता लोक स्वच्छतेच्या बाबतीत अधिक जागृत झाले आहेत.

5. उज्वला योजना हा एक चांगला उपक्रम आहे. परंतू किती लोक दूसरा सिलेंडर खरेदी करतात हे पाहणे अजून बाकी आहे. याआधी सिलेंडर आणि स्टोव विनामूल्य होते, परंतू आता त्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागत आहेत. सरकार सत्तेत आल्यापासून सिलेंडरच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. आणि त्याची किंमत 800 रुपये प्रती सिलेंडर आहे.

6. ईशान्य भारतातील राज्यांशी कनेक्टिव्हिटीत निश्चितपणे सुधारणा झाली आहे. अधिक रेल्वे, रस्ते, गाड्या, विमान वाहतूक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आता या राज्यांना मुख्य न्यूज चॅनेलमध्ये जागा मिळू लागली आहे.

7. प्रादेशिक पक्षांपेक्षा आताच्या कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली आहे.

वाईट गोष्टी-

देश घडवण्यासाठी अनेक दशके आणि शतके लागतात. मी भाजपचे सर्वात मोठे अपयश हे पाहतो की, आहे की त्यांनी काही साध्या कारणांमुळे अनेक महान गोष्टी नष्ट केल्या आहेत.

1. इलेक्ट्रोरल बॉण्ड्स- याने भ्रष्टाचाराला कायदेशीर केले आहे. कॉर्पोरेट्स आणि विदेशी शक्तींना आपल्या राजकीय पक्षांना विकत घेण्यास परवानगी दिली आहे. बॉण्ड्स अनामिक (नाव नसलेले) असतात, जर एखाद्या कॉपोर्रेटने म्हटले की, जर तुम्ही हे विशिष्ट धोरण मंजूर केले तर आम्ही तुम्हाला 1 हजार कोटी रुपयांचा इलेक्ट्रोरल बॉण्ड्स देऊ. यावरून हे स्पष्ट होते की या प्रकारे मंत्र्यांच्या पातळीवर भ्रष्टाचार कमी झाला आहे. हे प्रती फाइल आणि आदेशाच्या स्तरावर नाही. आता हे अमेरिकेच्या धोरणाप्रमाणे झाले आहे.

2. नियोजन आयोग अहवाल- हा माहिती (डाटा) मिळवण्यासाठीचा महत्वाचा स्त्रोत म्हणून वापरला जात होता. यात सरकारी योजनांचे लेखापरीक्षण केले जात असे आणि त्या कशा प्रकारे चालू आहे याची माहिती सांगितली जात असे. आता त्याला काही पर्याय राहिला नाही. सरकार जी काही माहिती (डाटा) देईल त्यावर विश्वास ठेवावा लागतो. नीती आयोगाकडे याचे अधिकार नाहीत. मुळात ते फक्त एक थिंक-टॅंक आणि पीआर एजन्सी आहे. योजना/गैर योजना यातील अंतर हे योजना आयोगाला हटवल्याशिवाय देखील करता आले असते.

3.  सीबीआय आणि ईडीचा गैरवापर- जसे की मी पाहत आहे की, या संस्थांचा वापर राजकीय कारणांसाठी केला जात आहे. आणि जरी असे नसेल तरी मोदी आणि शहा यांच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांच्या विरोधात या संस्थांना त्यांच्या मागे लावले जाते. हे लोकशाहीच्या ‘असहमती’ या अभिन्न अंगाला संपवण्याचा पर्याप्त मार्ग आहे.

4. कालिखो पुल यांच्या आत्महत्येची चिठ्ठी, न्यायाधीश लोया यांचे निधन, सोहराबुद्दीन हत्या, बलात्कार करणार्‍या एका आमदाराला वाचवणे, ज्याच्या नातेवाईकांवर एका उन्नाव मधल्या मुलीच्या वडिलांच्या खुनाचा आरोप आहे. अशा घटनेचा गुन्हा एक वर्षांपर्यंत दाखल करण्यात आला नव्हता.

5. नोटबंदी- यात सरकार पुर्णपणे अयशस्वी ठरले. परंतु यात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की, भाजप ही गोष्टी स्विकारण्यास तयार नाही. दहशतवादाला मिळणारा निधी रोखणे, रोख कमी करणे, भ्रष्टाचार कमी करणे या सारखा प्रोपगंडा हास्यास्पद आहे. याने अनेक उद्योगधंदे बंद पडले.

6. जीएसटीची अंमलबजावणी- घाईघाईत लागू केली गेल्याने अनेक उद्योगधंदे बंद पडले. गुंतागुंतीची रचना व वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळे कर, अवघड भरणा… आशा आहे की, हे काही काळानंतर स्थिर होईल, परंतू यामुळे नुकसानच झाले आहे. परंतू भाजप अपयश स्विकारण्यास उध्दटपणा दाखवते.

7. गोंधळलेले परराष्ट्रधोरण- चीनचे श्रीलंकेत एक बंदर आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये मोठे हित आहे. भारत मालदिवमध्ये अपयशी ठरला आहे. भारताच्या अपयशी परराष्ट्र धोरणामुळे भारतातील कामगारांना व्हिसा मिळत नाही असे असताना मोदीजी जेव्हा परदेशात जातात तेव्हा  सांगतात की, 2014 पूर्वी भारतीयांना जगात कोणताही सन्मान मिळत नव्हता आणि आता तो सन्मान मिळत आहे. (हे मूर्खपणाचे आहे. परदेशात भारताचा आदर हा वाढती अर्थव्यवस्था आणि आयटी क्षेत्राचा थेट परिणाम आहे. यामध्ये मोदींमुळे इंचभरही सुधारणा झाली नाहीये. या उलट बीफ बाळगल्याबद्दल हत्या, पत्रकारांना धमक्या..कदाचित यानेच सन्मान कमी झाला आहे.)

8. योजनांमध्ये असफलता- संसद आदर्श ग्राम योजना, मेक इन इंडिया, कौशल्य विकास, फसल विमा योजना (परतफेडीकडे लक्ष द्या – सरकार विमा कंपन्यांच्या खिशात घालत आहे.) बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे संकट स्विकारणयात सरकार अपयशी- प्रत्येक वास्तविक मुद्यांना विरोधकांचा स्टंट सांगण्यात येते.

9. पेट्रोल-डिझेल- यांच्या वाढणार्‍या किमतींबाबत मोदी, भाजपचे सर्व मंत्री आणि समर्थकांनी कॉंग्रेस सत्तेत असताना खूप टीका केली. आणि आता हे सर्व वाढलेल्या किंमती योग्य असल्याचे सांगत आहेत. परंतू कच्चे तेल हे पूर्वीच्या तुलनेत आता स्वस्त आहे. हे अस्विकार्य आहे.

10. सर्वात मूलभूत मुद्यांवर काम करण्यास असमर्थ – शिक्षण आणि आरोग्य. शिक्षणावर काहीच करण्यात आले नाही, हे देशाचे सर्वात मोठे अपयश आहे. सरकारी शाळांची गुणवत्ता दशकांपासून (एएसईआर अहवाल) बिघडली आहे आणि कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांनी चार वर्षांपर्यंत आरोग्यसेवांवर काहीही केले नाही, नंतर आयुष्मान भारतची घोषणा करण्यात आली. या योजने अंतर्गत काही केले जाणार नाही या अपेक्षेने मला जास्त भीती वाटत आहे. विमा योजनांचा भयानक विक्रम आहे आणि हे अमेरिकेच्या मार्गाने जात आहे, हे आरोग्यसेवांसाठी एक भयानक उद्दिष्ट आहे.

तुम्ही या मुद्यांमध्ये तुमच्या जाणिवेनुसार काही जोडू शकतात अथवा कमी करू शकतात. परंतु हे माझे मूल्यांकन आहे. इलेक्ट्रोरल बॉण्ड्सचा प्रश्न मोठा आहे. आशा आहे की, सर्वोच्च न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करेल. प्रत्येक सरकारकडे काही अपयश आणि काही वाईट निर्णय असले तरी माझ्यासाठी सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे हे सरकार कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त त्यांच्या आचार-विचारांवर आधारित आहे.

अत्यंत भयानक-

या सरकारची खरी नकारात्मक्ता ही आहे की, कशाप्रकारे त्यांनी विचारपूर्वक राष्ट्रीय स्तरावर चर्चाना प्रभावित केले. हे कोणतेही अपयश नाही, ही योजना आहे.

1. त्यांनी मिडियाला बदनाम केले आहे, म्हणून आता प्रत्येक पत्रकाराच्या टीकेला हे सांगून नाकारले जात आहे की, याला भाजपने पैसे दिले नाहीत किंवा कॉंग्रेस कडून पैसे पुरवले जातात. मी अनेक पत्रकारांना ओळखतो ज्यांच्यासाठी हे आरोप योग्य नाहीत परंतू महत्त्वाचे म्हणजे कुणीही याबद्दल आरोप किंवा तक्रार करत नाही. ते मुद्दे उचलून धरणार्‍या व्यक्तींवर हल्ले करतात आणि स्वताच मुद्यांकडे दुर्लक्ष करतात.

2. असा दृष्टिकोन बनवण्यात आला आहे की. 70 वर्षात भारतात काहीही काम झालेले नाही. हे पूर्णपणे खोटं आहे. आणि ही मानसिकता देशासाठी हानिकारक आहे. या सरकारने आपल्या करदात्याचे 4 हजार कोटी रुपये जाहिरातबाजीवर खर्च केले आहे आणि आता ही प्रवृत्ती बनून जाईल. कामं छोटी आणि गवगवा(ब्रंडिंग) फार. ते रस्ते बनवणारे पहिले व्यक्ती नाहीत, काही असे रस्ते आहेत ज्यावरून मी प्रवास केला आहे, ते अखिलेश आणि मायावती यांनी बनवले आहेत. 1990 पासून भारत आयटी पॉवर हाऊस बनला आहे. मागील कामगिरीचे मोजमाप करणे आणि आजच्या परिस्थितीवर आधारित भूतकाळातील नेत्यांना शिव्या देणे सोपे आहे.

याचे उदाहरण- 70 वर्षात कॉंग्रेसने शौचालायचे निर्माण का केला नाही? ते इतक्या साध्या मूलभूत गोष्टी देखील करू शकले नाही. हे विधान तार्किक वाटते आणि मी सुद्धा हेच मानले, जोपर्यंत मी भारताच्या इतिहासाचे वाचन सुरु केले नाही. 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपण एक अत्यंत गरीब देश होतो, आपल्याकडे अगदी मूलभूत पायाभूत सुविधा आणि भांडवलासाठीही साधने नव्हती. याचा प्रभाव कमी करण्यासाठी नेहरू समाजवादी मार्गावर चालले आणि पीएसयू (पब्लिक सेक्टर यूनिट) ची निर्मिती केली. आपल्याकडे स्टील निर्माण करण्याची देखील क्षमता नव्हती, त्यामुळे रशियाच्या मदतीने हेवी इंजिनीअरिंग कार्पोरेशन (एचईसी), रांची या तंत्रज्ञानाची स्थापना करण्यात आली. भारतातील स्टीलची निर्मिती करण्यासाठी मशीन तयार केले गेले. त्याशिवाय आपल्याकडे कोणतेही स्टील नसते आणि परिणामी कोणत्याही पायाभूत सुविधा नसत्या. मूलभूत उद्योग आणि पायाभूत सुविधा हाच एक अजेंडा होता. आपण वारंवार दुष्काळाचा सामना केला, दर 2-3 वर्षांनी, आणि पुष्कळ लोक भुकेने मृत्युमुखी पडले. लोकांना अन्न उपलब्ध करून देणे हे प्राधान्य होते. शौचालय ही एक श्रीमंती होती, ज्याची कोणालाही चिंता नव्हती. हरितक्रांती झाली आणि 1990 पासून अन्नटंचाई अदृश्य झाली. आता आपल्याजवळ अतिरिक्त समस्या आहे. शौचालयांची स्थिती तशीच आहे जशी पुढील 25 वर्षांनंतर लोक विचारतील की मोदी भारतातील सर्व घरांना वातानुकूल (AC) का नाही करू शकले. हे आज एक लक्झरी सारखे वाटते, पण त्या काळात शौचालय देखील एक लक्झरी होते. कदाचित काही गोष्टी लवकर झाल्या असत्या, कदाचित 10 वर्ष आधी. परंतू 70 वर्षात काहीच झाला नाही हे भयंकर खोटं आहे.

3. खोट्या बातम्यांचा प्रसार आणि त्यावर विश्वास- काही भाजप विरोधी बातम्या ही आहेत परंतू भाजप समर्थक आणि विरोधी पक्षांच्या खोट्या बातम्यांनी त्यांना संख्या आणि प्रसाराच्या बाबतीत कित्येक मैलांवर दूर सारले आहे. त्यापैकी काही समर्थकांकडून येतात, पण त्यापैकी बराच बातम्या पक्षाकडून आलेल्या असतात. या बातम्या खर तर द्वेष आणि ध्रुवीकरण निर्माण करणार्‍या असतात. यामुळे परिस्थिती आणखीनच खराब होते. सरकारने पाठिंबा दिलेल्या ऑनलाइन बातम्यांच्या पोर्टलमुळे आपल्या माहितीपेक्षा अधिक प्रमाणात समाजाला हानी पोहोचवत आहेत.

4. हिंदूंना धोका आहे- त्यांनी लोकांच्या मनात भरून दिले आहे की हिंदू आणि हिंदुत्व धोक्यात आहे. आणि स्वताला वाचवण्यासाठी मोदी हे एकमात्र पर्याय आहे. प्रत्यक्षात या सरकारापेक्षा खूप आधीपासून हिंदू एकसारखे जीवन जगत आहेत आणि लोकांच्या मानसिकतेशिवाय काहीच बदललेले नाही.
आपण हिंदू 2007 मध्ये धोक्यात होतो का? कमीत कमी मी तरी या बाबतीत रोज ऐकलं नव्हतं. नाही की मी हिंदूंच्या बाबतीत काही सुधारणा पाहतो आहे. आता फक्त अधिक भीती आणि घृणा आहे.

5. जर तुम्ही हिंदू विरोधी बोलत असाल तर तुम्ही राष्ट्रद्रोही आहात, आणि आताच्या परिस्थितीत हिंदू विरोधी आहात. या लेबिलिंगसह सरकारवर होणारी वैध टीका बंद आहे. आपल्या राष्ट्रवादाला सिद्ध करा, सर्वत्र वंदे मातरम् गा. (जरी भाजप नेत्यांना स्वत:ला शब्दांचे अर्थ समजत नसले तरी, ते तुम्हाला गाण्यासाठी सक्ती करतील!). मी एक पक्का राष्ट्रवादी आहे आणि माझा राष्ट्रवाद मला ही अनुमती देत नाही की, कोणी मला तो दाखवण्यासाठी सक्ती करेल. मी राष्ट्रगीत गर्वाने म्हणेल जेव्हा त्यासंबंधित काही कार्यक्रम असेल किंवा ज्यावेळी मला आवडेल तेव्हा. परंतू कोणाच्या सक्तीने मी स्वताला ते गाण्यासाठी जोर-जबरदस्ती करणार नाही.

6. भाजप नेत्यांच्या मालकी असलेल्या न्यूज चॅनलचे एकमात्र काम आहे की, हिंदू-मुस्लिम, राष्ट्रवादी –राष्ट्रविरोधी, भारत-पाकिस्तान यांच्यावर चर्चा करणे आणि सार्वजनिक चर्चांमध्ये मुद्यांना आणि तर्कांना बाजूला सारून दृवीकरण करणाऱ्या भावनांमध्ये घेऊन जाणे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, हे कोणते चैनल आहेत. आणि तुम्ही त्या चर्चा करण्यासाठी बसलेल्या सगळ्यांना ओळखतात. ज्यांना वादग्रस्त प्रोपगंडाच्या प्रचारासाठी तिथे बोलावले जाते.

7. ध्रुवीकरण- विकासाचा संदेश निघून गेला आहे. पुढच्या निवडणुकीसाठी भाजपचे धोरण हे ध्रुवीकरण आणि ढोंगी राष्ट्रवादाला खतपाणी घालणे आहे. नरेंद्र मोदी यांनी मुळातच त्यांच्या भाषणात म्हटले आहे – जिना; नेहरू; काँग्रेस नेत्यांनी तुरुंगात भगतसिंग यांना भेटायला गेले नाहीत (स्वतः पंतप्रधानांद्वारे बनावट बातमी), कॉंग्रेस नेत्यांनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी नेते भेटले, कॉंग्रेस नेते गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी पाकिस्तानी नेत्यांना भेटले. योगींनी भाषणात असे संगितले की, कसे महाराणा प्रताप अकबर पेक्षा महान होते. जेएनयू चे विद्यार्थी राष्ट्राविरोधी आहेत, ते भारताचे तुकडे तुकडे (#TukdeTukdeChurChurIndia) करतील. हे सगळे प्रोपगंडे एक विशिष्ट उद्देशाने बनवले गेले होते की, निवडणुकीत ध्रुवीकरण करा आणि विजय मिळवा. हे ते नव्हतं जे मला माझ्या नेत्यांकडून ऐकायची इच्छा होती. मी अशा व्यक्तीच अनुसरण करण्यास विरोध करेल जो राजकीय लाभासाठी राष्ट्राला दंगलींमध्ये जाळण्याची इच्छा बाळगतो.
ही काही उदाहरणे आहेत की, कसे भाजप राष्ट्रीय संवादाला एका अंधार्‍या कोपर्‍यात ढकलत आहे. हे ते नाही ज्यासाठी मी यांच्याशी जोडलो गेलो होतो. हे ते नाही ज्याचं मी समर्थन करू शकेल. यासाठी मी भाजपचा राजीनामा देत आहे.

PS :  मी 2013 पासून भाजपचे समर्थन केले कारण नरेंद्र मोदीजी भारताच्या आशेचा किरण वाटत होते आणि मी त्यांच्या विकासाच्या संदेशावर विश्वास ठेवला होता. हा संदेश आणि आशा दोन्ही आता गायब झाले आहेत. या नरेंद्र मोदी आणि अमित शाह सरकारच्या नकारात्मक गोष्टी आता माझ्यासाठी सकारात्मक आहेत, परंतु हा एक निर्णय आहे की, जो प्रत्येक मतदाराने व्यक्तीगत स्वरूपात घेणे आवश्यक असते. फक्त याची जाणीव ठेवा की इतिहास आणि वास्तव जटिल आहे. कोणत्याही प्रोपगंडाशी सहमत होणे आणि अंधविश्वासाने त्या पंथच समर्थन करणे हे खूप वाईट आहे. हे या देशाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात आहे.

निवडणुकीच्या दृष्टीकोनानुसार आपल्या सर्वांकडे आपले स्वताचे निर्णय आहेत. त्यासाठी माझ्या शुभेच्छा. माझी एकाच आशा आहे की, आपण सर्व एकत्र प्रेमपूर्वक राहू शकू आणि काम करू शकू तसेच एक चांगले, मजबूत, गरिबी मुक्त आणि विकसित भारत बनवण्यासाठी योगदान देऊ. भले ही मग आपण कोणत्याही पक्षाची किंवा विचारसरणीचे समर्थन करत असू. हे कायम लक्षात ठेवा की दोन्ही बाजूला चांगले लोक असतात, मतदारांना त्यांचे समर्थन करण्याची गरज आहे. आणि त्यांनाही एक दुसर्‍यांचे समर्थन करण्याची आवश्यकता आहे. मग ते वेगवेगळ्या पक्षांचे असतील.

(The writer,Shivam Shankar Singh worked on the BJP’s election campaigns in several North-Eastern States as a part of Ram Madhav’s team.)

(This blog was first published on Medium and has been republished with permission.)

( The views expressed are the author’s own.The POST neither endorses nor is responsible for them.)

Loading...

‘देशातील अघोषित आणीबाणी; आणीबाणी पेक्षा अधिक भयंकर’; राजस्थानमध्ये राजकीय गोंधळ

Previous article

पॅरानॉर्मल एक्सपर्टने केला सुशांतच्या आ त्म्या सोबत बादचीत केल्याचा दावा, सुसाईडचे कारण विचारल्यावर मिळाले हे उत्तर !

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *