Royal Entertainmentमुख्य बातम्या

नक्की पहा कोरोनाने शिकवलेले पैशाबद्दलचे हे ५ धडे, चुकूनही दुर्लक्ष करू नका..

0

royalmarathi.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. मित्रांनो कोरोना या महामारीमुळे पूर्ण जग हादरून गेले आहे. आजच्या तारखेपर्यंत पूर्ण जगात तीन करोड ऐंशी लाख पेक्ष्या जास्त लोकांना कोरोना झाला आहे. त्या पैकी दोन करोड ऐंशी लाख पेक्ष्या जास्त लोक पूर्णपणे बरी झाली आहेत आणि दुर्दैवाने दहा लाख पेक्षा जास्त लोकांचा या कोरोना मुळे मृ त्यू झाला आहे. आपल्या भारतात सुद्धा आजच्या तारखेपर्यंत कोरोना रुग्णाचा.

आकडा पंचाहत्तर लाखांच्या वर गेला आहे. त्यात बरेच लोक पूर्ण बरे देखील झाले आहेत आणि दुर्दैवाने खूप लोकांचा मृ त्यू देखील झाला आहे. या कोरोनाच्या महामारीमुळे पूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पण या कोरोनाने आपल्याला पैश्या बद्दल पाच महत्वच्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या आपण आजच्या लेखात बगणार आहोत. त्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. पहिला आहे हेल्थ इन्शुरन्स चे महत्व. मित्रांनो प्रत्येक वर्षी हेल्थ इन्शुरन्स विकत घेणे.

किती महत्वाचे आहे ते आपल्याला कोरोनामुळे समजले. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आपण आपल्या परिवारासाठी एका वर्षासाठी दवाखान्यात होणाऱ्या उपचारासाठी असलेली पॉलिसी. काही दिवसांपूर्वी एक वेळ अशी होती सरकारी दवाखान्यात कोरोना रुग्णासाठी एकही बेड उपलब्ध नव्हते. अश्या वेळेस नाइलाजाने लोकांना खाजगी दवाखान्यात जावे लागले. आणि सामान्य माणसाला खाजगी दवाखान्यातील खर्च अजिबात परवडत नाही. अश्या वेळेस हेल्थ इन्शुरन्स कामाला येतो.

तुमच्या परिवाराचा तीन लाख किंवा पाच लाखाचा इन्शुरन्स असेल तर तुम्ही निर्धास्त राहता. नाही तर गरजेच्या वेळेला पैश्याची जमवाजमव करणे. इतरांकडे पैसे मागणे. दागिने मोडणे अश्या गोष्टींना सामोरे जावे लागते म्हणून वर्ष्याला थोडे पैसे भरून परिवाराचा हेल्थ इन्शुरन्स करणे शहानपणाचे आहे. दुसरी आहे इमर्जन्सी फंड. मित्रांनो आपण पाहिले की या कोरोना काळात लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि अर्थव्यवस्था कोलमडल्या मुळे कंपनीत नोकरी नाहीत, त्यामुळे लाखो लोकांचे महिन्याचे.

उत्पन्न अचानक बंद झाले. अनेक बातम्या वाचायला मिळाल्या असतील की आर्थिक अडचणी मुळे या कोरोना काळात खूप लोकांनी आ त्म ह त्या केली . त्यामुळे मित्रांनो उद्या जर अशी परिस्थिती तुमच्यावर ओढवली तर तुमच्याकडे सहा महिने किंवा वर्षभर तुमचे घर चालावे एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे उपलब्ध हवा. म्हणजे तुमच्याकडे एवढे पैसे पाहिजेत की तुमच्या महिन्याचे उत्पन्न बंद झाले तरी सहा महिने किंवा एक वर्षभर तुमचे घर काही अडचण न येता चालले पाहिजे.

तिसरी आहे पोर्ट पोलिओची विभागनी आवश्यक. मित्रांनो या कोरोनामुळे शेयर मार्केट सुद्धा कोसळले होते तुम्ही जर शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल तुम्हला समजले असेल की तुम्हला कोणत्याही एका सेकटर मध्ये गुंतवणूक करून फायदा नाही. तुम्हाला तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या सेकटर मध्ये करावी लागेल. याचे कारण म्हणजे एक किंवा दोन सेक्टर कोसळले तरी दुसरे सेक्टर वर असल्यामुळे तुमचे नुकसान होत नाही. मित्रांनो तुम्ही शेयर मार्केट मध्ये नवीन आहात का?.

तुम्हला शेयर मार्केट बद्दल काहीच माहीत नाही का? पण शिकायची इच्छा आहे. तर तुम्ही त्याची माहिती करून घेणे काळाची गरज आहे. चौथे आहे, बचतीचे महत्त्व. बचत म्हणजे फालतू खर्च टाळणे. मित्रांनो या लॉक डाऊन मध्ये माझा मित्रांच्या सुद्धा काही नोकऱ्या गेल्या. ज्या वेळेस मित्रांसोबत बोलायचो तेव्हा ते सांगायचे आमच्याकडे पैसे होते तेव्हा आम्ही ते कोणत्याही गोष्टीवर खर्च केला. प्रत्येक आठवड्याला पार्ट्या करणे, महागडे कपडे चप्पल घेणं. जर त्यावेळी पैसे वाचवले असते.

किंवा कुठे तरी गुंतवले असते तर आता संकट काळी कामाला आले असते. मित्रांनो या कोरोनाने आपल्याला बचतीचे महत्व शिकवले आहे. वॉरन बफे म्हणतात की जर तुम्ही अश्या गोष्टी विकत घेतल्या ज्याची तुम्हला गरज नाही तर काही काळाने तुम्हला अश्या वस्तू विकाव्या लागतील ज्याची तुम्हाला गरज आहे. त्यामुळे बचतीचे महत्व जाणून घ्या. पाचवा आहे प्यासिव्ही इन्कम चे महत्त्व. मित्रांनो प्यासिव्ही इन्कम म्हणजे काम एकदाच करायचे पण त्या कामाचे पैसे तुम्हला सातत्याने मिळत राहणार.

उदाहरण म्हणजे समजा तुमची थोडी जमीन आहे, तिथं तुम्ही छोट्या छोट्या खोल्या बांधता आणि त्या भाड्यानं देता. त्या खोल्यांचे भाडे तुम्हला आयुष्यभर मिळत राहणार. प्यासिव्ही इन्कम चे दुसरे उदाहरण म्हणजे शेयर मार्केट मध्ये चागल्या स्टॉक मध्ये पैसे गुंतवणे आता ती कंपनी जसजशी प्रगती करत राहणार तुम्हला त्याचा मोबदला आयुष्यभर मिळत राहणार. सध्या इंटरनेट मुळे तुम्ही अनेक मार्गाने प्यासिव्ही इन्कम कमवू शकता. या कोरोनाने आपल्याला प्यासिव्ही इन्कम चे किती महत्व आहे हे सांगितले आहे.

या 6 राशींचे तारे चमकणार, भगवान श्रीशिवशंकरांच्या कृपेने मोठा धन लाभ मिळण्याचा योग बनत आहे…

Previous article

झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवा लसणाची पाकळी, सकाळी उठल्यावर चकित व्याल…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.