महाराष्ट्रमुख्य बातम्या

उपसा सिंचन योजनेला सुप्रमा मिळावी – शैला गोडसे

0

सोलापूर 18 फेब्रुवारी (हिं.स)- मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे पाणी २ टीएमसी ऐवजी १ टीएमसी उपलब्ध होत असल्याने नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. पाणी कमी न करता इतर ठिकाणाहून उपलब्ध करून द्यावे व या योजनेला नव्याने प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख अधिकारी खलील अन्सारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त २४ गावातील ११,८२० हेक्टर शेतीसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली होती. या योजनेला २ टीएमसी पाणी देण्याचे मान्य करण्यात आले होते.

या योजनेद्वारे उजनी जलाशयातून मंगळवेढ्याच्या हक्काचे पाणी माण नदीमध्ये सोडून बॅरेजेस बांधून वीजपंपाद्वारे पाण्याचा उपसा करून बंद पाईपलाईन व कालव्याद्वारे शेतीला देण्यासाठी २०१४ मध्ये ही योजना तयार करून प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. या योजनेसाठी ५३० कोटी रूपयांचे अंदाजपत्रक तयार करून ६ सप्टेंबर २०१४ रोजी शासनाच्या शिफारशीद्वारे प्रशासकीय मान्यतादेखील घेतली होती. या उपसा सिंचन योजनेची नव्याने तांत्रिक तपासणी करण्यात आली. मात्र यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी २ टीएमसी पाण्याचे नियोजन चुकीच्या पद्धतीने व घाईगडबडीने व राजकीय दबावापोटी केले होते.

Loading...

त्यामध्ये दुरूस्ती करत १ टीएमसी पाणी उपलब्ध होत असल्याने अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार मंत्रीमंडळात २७ जून २०१८ रोजी हा मुद्दा मान्य करण्यात आला होता. त्यासाठी नव्याने प्रशासकीय मान्यता घेण्याचे निर्देशही मंत्रीमंडळाच्या बैठकीत देण्यात आले होते.

मात्र, अद्यापपर्यंत या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. शेतकऱ्यांचा हाच अस्मितेचा मुद्दा घेऊन शैला गोडसे यांनी पुणे येथील सिंचन भवनात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख अभियंता अन्सारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

Loading...

शेतीच्या वादातून दिव्यांग शेतकऱ्याचा खून

Previous article

सुशीलकुमार शिंदे यांची बदनामी करणा-या तिघांवर गुन्हा दाखल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.