मुख्य बातम्या

आम्ही छाती फोडली तरी शरद पवारचं दिसतील, राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार परतले !

0

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे चांगलेच अडचणीत येत असल्याचं दिसत आहे. कारण त्यांच्या गटातील आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे येऊ लागले आहेत. दिंडोरीचे बेपत्ता असलेले आमदार नरहरी झिरवळ हे देखीलं शरद पवारंकडे परत आले आहेत. कडेकोट बंदबोस्त चुकवून नरहरी झिरवळ यांनी मार्ग काढत शरद पवारांपर्यंत पोहचलो असल्याचा थरारक प्रसंग सांगितला आहे. तर सध्या ते दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी आहेत.

ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसात जे काही चालू होत ते अतिशय धक्कादायक होत. याबाबत आम्हाला काहीही पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती. शपथविधीच्या दिवशी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी उपस्थित रहा असा संदेश आला होता. त्यानंतर राजभवनावर घेऊन जाण्यात आले. शपथविधी पार पाडला. तिथे आपले अजून आमदार येत आहेत असे सांगण्यात आले. मात्र ते आले नाहीत. तेथून आम्हाला दिल्लीतील मोठ्या हॉटेलमध्ये आणण्यात आले. या हॉटेल बाहेर मोठा बंदोबस ठेवण्यात आला.

Loading...

त्यानंतर माध्यमांतून आम्हाला सगळ काही कळू लागलं. मग आम्ही 4 – 5 आमदारांनी एकत्र येत हे चुकीचं होत असल्याचं ठरवत शरद पवारांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना आम्ही तुमच्या सोबतच असल्याचं आश्वस्त केलं. हा सारा प्रकार गैरसमजुतीतून झाल आहे. आम्हाला याबाबत काहीही कल्पना नव्हती. शरद पवारांनी नंतर आमची या कडेकोट बंदोबस्तातून सुटका केली. काहीही झालं तरी आम्ही शरद पवारांमुळे इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे आमची छाती फोडली तरी शरद पवारचं दिसतील असे विधान नरहरी झिरवळ यांनी केले आहे.

दरम्यान बेपत्ता असलेले आ. अनिल पाटील आणि आ. दौलत दरोडा हे देखील पुन्हा शरद पवारांकडे आले आहेत. त्यांनीही असाचं चित्त थरारक प्रसंग सांगितला आहे. अजित पवारांनी कागदपत्रांचा गैरवापर करत भाजपला पाठींबा दिला आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर अजित पवारांनी भाजपला दिलेला पाठींबा हा त्यांचा वैयक्तिक पाठींबा आहे. अजित पवारांच्या या निर्णयाला पक्षाचा पाठींबा नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

Loading...

सुनील शेळकेंचा झंझावात सुरूच, भाजपला दिला जबर दणका !

Previous article

जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट, 162 आमदार सोबत असल्याचा पुरावाच केला सादर !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.