मुख्य बातम्या

आणि शरद पवारही म्हणाले “मी पुन्हा येईल” पहा -video

0

विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या खा. शरद पवार यांच्या नागपूर येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर भारीच विनोद झाला, आणि साहेब म्हंटले मी पुन्हा येईल

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नागपूर आणि परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र राज्यात इतरही घडामोडी घडत असल्यामुळे मला तात्काळ नागपूरला येता आले नाही. परंतु वेळोवेळी माझ्या सहकाऱ्यांकडून माहिती घेतली. काल नागपूर दौऱ्यादरम्यान दहा ते बारा गावांमध्ये नुकसानाची पाहणी केली.

Loading...

विदर्भातील महत्त्वाच्या पिकांवर अवकाळी पावसाचा परिणाम झालेला दिसतोय. संत्रा, मोसंबी, धान, कपाशी, सोयाबिन आणि काही ठिकाणी ज्वारीच्या पिकांवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे अभूतपूर्व अशा प्रकारचे नुकसान झालेले आहे.

संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे सर्व पीक वाया गेले आहे. जी संत्री झाडावर आहेत, त्यांचा आकार कमी झालेला असून त्याला गळ लागलेली आहे. मोसंबी आणि संत्र्यांच्या झाडांना जायबॅग नावाचा रोग झालेला आहे. त्यामुळे संत्री उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय.

धानामध्ये दाणाच भरलेला नाही. कपाशीच्या झाडांची वाढ चांगली आहे, मात्र योग्य बोंड आले नाही. जी बोंड आली त्याचे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्याही शेंगा सडल्या आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

विदर्भातील शेतकऱ्यांना काय आणि कशी मदत करता येईल, याचा आम्ही अभ्यास करू. केंद्र सरकारमधील कृषी आणि अर्थमंत्र्यांना भेटून केंद्र सरकारने यासंबंधी बैठक बोलवावी, शेती संबंधित संस्था, राज्य सरकारचे प्रतिनिधी यांना बैठकीसाठी बोलवावे असा प्रस्ताव मी मांडणार आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज घेतले. अवकाळी पावसात पिक गेले, मात्र कर्ज राहिले. त्यामुळे कर्जमाफी करून केंद्र सरकारच्या अर्थखात्याकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता येईल का? याबाबत प्रयत्न करु.

३३ टक्के नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामा होतील, असे सरकार म्हणत आहे. मात्र मी प्रत्यक्ष पाहणी केली असता जास्त नुकसान झालेले निदर्शनास आले. त्यामुळे माझी मागणी आहे की, सरसकट पंचनामे व्हावेत, जेणेकरून निश्चित किती नुकसान झाले आहे, हे समजेल.

केंद्र सरकारला या नुकसानाचे गांभीर्य माहीत आहे की नाही? याची कल्पना नाही. अर्थ मंत्रालयामध्येच विमा क्षेत्र अंतर्भूत असते. त्यामुळे पिक विम्याबाबतही मी चर्चा करणार आहे. तसेच कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी, अशी आमची मागणी आहे. असे शरद पवार बोलले

Short video- https://youtu.be/Euq8E7CJ4o0

संपूर्ण व्हिडिओ पहाण्यासाठी खलील लिंक वर कमेंट करा !

महाशिवआघाडी अधिकृत पेजला लाईक करण्यासाठी
खलील लिंक वर जावा

https://www.facebook.com/MahashivAghadi2019/

Loading...

ठरलं ! शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत अखेर घेणार हा निर्णय !

Previous article

निवडणुकीत सभांचा धुरळा उडवणाऱ्या मिटकरींवर राष्ट्रवादीने सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.