मुख्य बातम्या

अखेर ठरलं ; महाशिवआघाडी ऐवजी असेल आता हे नवीन नाव !

0

राज्यात महाशिव आघाडीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. तसेच येत्या डिसेंबर महिन्याच्या सुरवातीलाच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मात्र राज्यात तीन पक्षांच्या नेतृत्तावात सरकार स्थापन करण्यासाठी महाशिवाघाडी आणि महासेनाआघाडी या नावाला कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. ‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या नावातून केवळ शिवसेना या एकाच पक्षाचं नाव अधोरेखित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नावाचा यामध्ये उल्लेख होत नाही. महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या नावाऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवल्याची माहिती आहे.

दरम्यान, भाजप -शिवसेना आणि घटक पक्षांच्या एकत्रीकरणाला महायुती असे संबोधले जात होते तर राष्ट्रवादी – कॉंग्रेसला आणि इतर घटक पक्षांच्या एकत्रीकरणाला महाआघाडी म्हंटले जात होते. मात्र शिवसेनेने महायुतीतून बाहेर पडत महाआघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या तीन पक्षांच्या एकत्रीकरणाला महाशिवआघाडी असे संबोधण्यापेक्षा ”महाविकास आघाडी” संबोधावे असा प्रस्ताव कॉंग्रेसने मांडला आहे.

निवडणुकीत सभांचा धुरळा उडवणाऱ्या मिटकरींवर राष्ट्रवादीने सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

Previous article

सुनील शेळकेंचा झंझावात सुरूच, भाजपला दिला जबर दणका !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.